बहुदा वेळेला आपल्याला आपली आवडती गाणी ऐकण्याची इच्छा झाली कि युटूब वर ऐकतो परंतु ती गाणी आपल्याला आपल्या व्यक्तिगत संग्रालयात हवी हवीशी वाटतात.मला आठवतंय मी एका व्हिडीओ लायब्ररीत काम करीत होतो.अर्थात माझे पदवी शिक्षण करण्यासाठी! त्यावेळी गाण्याची cd घेण्यासाठी दुकानात लोकांची गर्दी व्हायची.इच्छित एका cd मधील गाणी आणि दुसऱ्या cd मधील इतर गाणी अशी कॉम्बिनेशन करायचे मग मोबाईलचा जमाना आला.नोकिया 6600 ( Hot cake) cd वरील आवडती गाणीच त्यामध्ये टाकायचो.cd मध्ये उपलब्ध नसलेली आणि आताच हवे या हट्टा पोटी मग युटूब वरून गाणी ऐकण्याची सवय लागली,मेल्या त्या जाहिरातीवाल्याचे तल्लक धुंदीत असताना जाहिरात यायची.मग "मूड कि मय्यत" व्हायची.नंतर songs.pk वरून गाणी download करून संग्रह करायचो आजही माझ्याकडे 89 Gegabyte इतकी गाणी आहे.
नवीन गाणी आली कि download करणे.Video editing करताना,मोबाईल रिंगटोन ठेवताना याचा उपयोग असायचा.आम्हा मित्रात तर शर्यत होती कोणाकडे किती GB गाणी असल्याचा.आदम कुरेशी हा माझा खूप जवळचा मित्र त्याच्याकडून मी खूप काही शिकलो वयाने ८-१० वर्षे लहान आहे.पण हुशार बुद्धी व बाजारात नवीन तंत्रज्ञान काय आले याची पूर्ण माहिती असायची.त्यानेच मला युटूब वरील गाणी download करण्याचे शिकविले होते.हेच नाही तर खूप काही शिकविले.
आज कालच्या जमान्यात गाणी download करून ऐकण्याची गोष्ट कोणी केली कि त्याला मुर्खात काढले जाते.Spotify,Gaana.com or Youtube Music हे सहजगत्या वापरले जाते.पण हि गोष्ट हि तशीच आहे.जाहिरातीवर आधारित.आज आपण सगळे fast forward झालो आहे.पैसे सहजपणे मिळाल्यामुळे आणि या apps ची रक्कमहि कमी ठेवल्याने तरुणाईला याची भुरळ पडते.या कंपनीचा फंडा हि तसाच असतो.उदा.पारंपारिक दुकानदारने पेन विकत दिल्यास ५ रु. आकार पडतील असे म्हटले भले दिवसभरात १०चपेन विकले गेले. तरी आणि दुसरा दुकानदार ३ रु,आकाराने विकतो म्हटल्यावर त्याच्या दुकानात गर्दी जास्त होते.यात दुकानादाराचा फायदा जास्त होतो.इथे २० पेन विकले जातील. खरेदीदाराची मानसिकता अशी आहे.Super Mall हे त्यातीलच उत्कृष्ट उदाहरण आहे. पारलेचा बिस्कीट पुडा मॉल मध्ये १० ऐवजी ८ ला दिला जातो.तेच बिस्कीट आपल्या शेजारील काय पूर्ण गल्लीत १०ला म्हणजे १०लाच मिळेल. असो विषयांतर झाले.
पण हि गोष्ट हि तितकीच खरी आहे.काहीना आजही युटूब वरून गाणी download करून ऐकण्याची सवय आहे.त्यांच्या आग्रहाखास्तव आजचे sharing आपल्यासोबत.
अश्याच काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करीत जाईन.लेख आवडला असल्यास इतर मित्रांनाही शेअर करा.Share केले कि Care झाल्यासारखे वाटते. ;D
आपला मित्र,
शमशुद्दीन शेख,
Comentarios