PowerPoint हा सर्वाना आवडणारा computer वरील software.जेव्हा मी संस्थेत अधीक्षक होतो.रमेश कांबळे नावाचा एक मुलगा होतो.वय जेमतेम १0-११ चा असावा.बाहेच्या जगाचे संपर्क नसताना हि स्वतःच्या कल्पना शक्ती आणि कुतुहलाने रमेशने PowerPoint अतिशय उत्तम असे त्याने क्रिकेट चे मैदान आणि प्लेअर बनविले होते.प्रत्येक slide वर तो चेंडू मैदान पार करत असल्याचे रेखाटन केले होते.हे बनविण्यासाठी त्याने ४ दिवस घेतले.संस्था भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक देणगीदारास मी ते अभिमानाने दाखवायचो.अशी बरीच मुले संस्थेत होती पंकज,संदीप,जीतबहादूर,अभिषेक,ऐश्वर्या,मोनी,सुषमा इत्यादी यांची कल्पनाशक्ती अतिशय रचनात्मक होती.
कोरोना संसर्गामुळे यापुढील जीवन खूपच वेगळे असणार आहे.हा आजार सहजासहजी पुढील ५-१० वर्ष तर आपल्यातून जाणार नाही.त्यामुळे जगाला संपर्क विरहित आभासी सभा,सभारंभ,मुलाखती,शालेय शिक्षण वगैरेची गरज भासणार आहे.यासाठी मुलांना तयार करणे गरजेचे आहे.आज आपण सर्वजण शाळा कधी सुरु होते,नातेवाईकांची लग्न अटेंड करतो,music सभारंभ कधी पाहायला मिळतील यासारख्या असंख्य गोष्टीची आपण वाट पाहत आहोत.
with 8GB free effects file link
आज बाजारात आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विविध प्रकारचे video editing चे प्रकल्प घेऊन लहान मोठ्या कंपनीना ते विकू शकतो आणि त्यातून रोजगार मिळू शकतो.हे software वापरला सोपे आहे.सहज जमू शकेल असे आहे.त्यामुळे मुलांना रिकाम्या वेळात हा software हाताळायला द्यावा.
अश्याच काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करीत जाईन.लेख आवडला असल्यास इतर मित्रांनाही शेअर करा.Share केले कि Care झाल्यासारखे वाटते. ;D
आपला मित्र,
शमशुद्दीन शेख,
Commenti