मी एका Residential Children Care Home मध्ये काम करण्याऱ्या NGO सोबत काम करीत होतो.त्यावेळेची हि गोष्ट आहे.साधारणतः हि वक्यात २०११-१२ ची असेल.नुकतेच त्या संस्थेत शिक्षक पदावर वरून निवासी अधीक्षक म्हणून काम सुरु केले होते.संस्थेचे अध्यक्ष महोदय एका computer दुरुस्त करण्याऱ्या सोबत आले होते.त्या दुरुस्तीकरास विचारले आपल्याला इथे मुलांसाठी Computer Hall उभा करावयाचा आहे.यामध्ये मुलांनी सामाजिक माध्यमांचा वापर टाळता येईल असे काही उपकरण अथवा software टाकता येईल का? त्यावेळी त्याने जी अंदाजे रक्कम सांगितली ती बहुदा संस्थेला परवडणारी नव्हती.मी त्या संभाषणात काही बोलणार तेव्हढ्यात अध्यक्ष साहेबांनी मध्ये कापत म्हटले " ज्याला जे जमते त्याने ते करावे ". अध्यक्षांचे बोलणे ऐकून घेतले कारण योग्य होत.माझ्याकडे computer मध्ये master केले याचे प्रमाणपत्र नव्हते.परंतु मला स्वतः मध्ये विश्वास होता कि आपण computer मध्ये master असल्याचा.तितका नाही पण चांगले Lab सांभाळू शकेल इतके तर नक्की.बराच अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले कि कोणत्याही computer ला Network मध्ये जोडणारी काही फाईल असते.तीन प्रकाराने आपण येणाऱ्या network ला अडवू शकतो.१.software based - यात website वरील content scan करून website block केली जाते.२.server अथवा Router based - server अथवा Router मध्ये निश्चीत website block करण्याची सोय असते.३.personal computer मध्ये system32 मध्ये network hosts फाईलमध्ये बदल करून करता येते.
वरील अभ्यास सिद्ध झाल्याने संस्थेतील computer वर बिन खर्ची hosts पद्धतीने सर्व computerला social media block केले.यात YouTube हि होते मुलांनी खूप विनवण्या केल्या आणि चुकीचा वापर करणार नाही या शर्तीवर युटूब सोबत बाकी ब्लॉक केले.
आज कोरोनाच्या महामारीच्या काळात मुले चार भिंतीमध्ये कैद आहेत.एकाच ठिकाणी राहत असल्याने डोक्यात नको असे विचार येतात.खुपश्या वेळी अभ्यास व्यतिरिक्त इतर सामाजिक माध्यमाने आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.पण याची लत लागली कि!
Comments